अटलबिहारी वाजपेयी 

यांच्या जीवनावर एक दृष्टिक्षेप 



अटल बिहारी वाजपेयी भारतीय राजकारणातील एक अत्यंत आदरणीय आणि प्रभावशाली नेता होते. 

त्यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे झाला. त्यांचे वडील कृष्ण बिहारी वाजपेयी हे शिक्षक होते आणि त्यांना हिंदी कविता आणि साहित्याची आवड होती, जी अटलजींमध्येही उतरली होती. वाजपेयींचे शिक्षण ग्वालियरमध्ये सरस्वती शिशु मंदिरमध्ये सुरू झाले आणि पुढे ते कानपूरमधील डीएव्ही कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेले. तिथे त्यांनी राजकारणशास्त्र आणि कायद्याचे शिक्षण घेतले.


अटलजींचे सार्वजनिक जीवन विद्यार्थी दशेपासूनच सुरू झाले. ब्रिटीश सत्तेला भारतातून पायउतार करण्यात महत्वाच्या ठरलेल्या 1942 मधील भारत छोडो चळवळीमध्ये सहभागी होऊन विद्यार्थीदशेतच वाजपेयी यांनी राष्ट्रवादी राजकारणाचे धडे गिरवले. राज्यशास्त्र व कायद्याचे विद्यार्थी असलेल्या श्री. वाजपेयींना शालेय काळातच परकीय व्यवहारामध्ये रुची निर्माण झाली होती. त्यांनी ही आवड पुढे अनेक वर्ष जोपासली व विविध द्विपक्षीय व बहुपक्षीय व्यासपीठांवर भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी ह्या कौशल्याचा उपयोग केला.ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सदस्य झाले आणि संघाच्या विचारसरणीला अनुसरून त्यांनी राष्ट्रवादी विचारसरणी अंगिकारली. 1942 मध्ये भारत छोडो आंदोलनात त्यांनी भाग घेतला, आणि त्या काळात या बद्दल त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला.


1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, वाजपेयींनी पत्रकारितेचा मार्ग निवडला आणि त्यांनी "राष्ट्रधर्म" नावाच्या पत्रिकेचे संपादन केले. त्यांनी जनसंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली, जो पुढे भारतीय जनता पार्टीमध्ये (भाजपा) रूपांतरित झाला. वाजपेयी 1951 साली जनसंघाचे सदस्य झाले आणि त्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द वेगाने उंचावली. ते संसद सदस्य म्हणून निवडून आले आणि पुढे देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली.


वाजपेयींनी 1957 साली पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली आणि उत्तर प्रदेशातील बलरामपूर मतदारसंघातून विजयी झाले. त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकीर्दीत अनेक महत्त्वाचे टप्पे आले. त्यांची वक्तृत्व क्षमता खूपच प्रभावी होती आणि त्यांनी आपल्या विचारांनी संसदेत सर्वांना प्रभावित केले. त्यामुळेच पंडित जवाहरलाल नेहरूंनी देखील त्यांच्यात भविष्यातील पंतप्रधान पाहिले होते.


1977 साली जेव्हा जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले, तेव्हा वाजपेयींना परराष्ट्र मंत्रीपद देण्यात आले. परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांना नवे परिमाण दिले. त्यांनी भारत आणि चीन, तसेच पाकिस्तान यांच्याशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले. त्याचबरोबर त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीत भाषण दिले, जे त्या काळात एक ऐतिहासिक पाऊल मानले गेले.


1980 साली जनता पक्षाचे विभाजन झाल्यानंतर, वाजपेयींनी लालकृष्ण अडवाणी आणि इतर सहकाऱ्यांसोबत भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. त्यांनी भाजपा पक्षाला मजबूत करण्यासाठी अखंडित प्रयत्न केले. सुरुवातीला भाजपा एक छोटा पक्ष होता, परंतु वाजपेयी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मेहनतीमुळे भाजपा राष्ट्रीय स्तरावर एक मोठा राजकीय पक्ष बनला.


1996 साली अटल बिहारी वाजपेयी पहिल्यांदा भारताचे पंतप्रधान झाले. तथापि, त्यांचे सरकार केवळ 13 दिवस टिकले, कारण त्यांच्याकडे लोकसभेत बहुमत नव्हते. यानंतर 1998 मध्ये पुन्हा एकदा वाजपेयी पंतप्रधान झाले, आणि यावेळी त्यांनी 13 महिन्यांचे स्थिर सरकार चालवले. त्यांच्या कार्यकाळात 1998 मध्ये भारताने पोखरणमध्ये अणुचाचणी केली, ज्यामुळे भारताने अण्वस्त्रधारी देशांच्या यादीत स्थान मिळवले. हा निर्णय देशाच्या संरक्षणासाठी आणि स्वाभिमानासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.


1999 साली कारगिल युद्धाच्या वेळीही वाजपेयींच्या नेतृत्वाने भारताला यश मिळवून दिले. त्यांनी काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानशी शांतता वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला, परंतु पाकिस्तानच्या कारवायांमुळे संघर्ष झाला. या कठीण काळातही वाजपेयींनी शांततेचा मार्ग सोडला नाही आणि त्यांनी पाकिस्तानबरोबर शांतता चर्चेला सुरुवात केली. लाहोर बस यात्रा हा त्याचाच एक भाग होता, ज्यातून त्यांनी आपली शांततेची भूमिका स्पष्ट केली.


1999 मध्ये झालेल्या निवडणुकीत वाजपेयींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याची संधी मिळाली आणि त्यांनी पाच वर्षांपर्यंत स्थिर सरकार चालवले. त्यांच्या कार्यकाळात देशात अनेक महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विकास योजना आणि प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना यांसारख्या महत्त्वपूर्ण योजना सुरू केल्या, ज्यामुळे देशाच्या विकासाला गती मिळाली. त्याचबरोबर त्यांनी अर्थव्यवस्थेत उदारीकरणाचे धोरण राबवले, ज्यामुळे भारताची अर्थव्यवस्था मजबूत झाली.


वाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या काळात त्यांनी सर्वसमावेशकता आणि सहिष्णुतेचे राजकारण केले. ते त्यांच्या विरोधकांशीही मैत्रीपूर्ण संबंध ठेवत असत. त्यांची कवितांची आवड आणि संवेदनशीलता त्यांना इतर नेत्यांपासून वेगळे ठरवायची. ते राजकारणात असूनही साहित्य आणि काव्याशी आपली नाळ जोडून ठेवायचे. त्यांच्या काही प्रसिद्ध कवितांमध्ये "मृत्यु या ठगिनी", "गीत नया गाता हूँ" आणि "कदम मिलाकर चलना होगा" यांचा समावेश आहे.


ज्येष्ठ संसदपटू असलेले अटल बिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते. श्री. वाजपेयी नऊ वेळा लोकसभेवर तर दोनवेळा राज्यसभेवर निवडून आले होते.


अटलबिहारी वाजपेयी अविवाहित राहिले, त्यांनी कधीही लग्न केले नाही. पण त्यांनी एक मुलगी दत्तक घेऊन ही कमतरता भरून काढली.त्यांना नमिता भट्टाचार्य नावाची एक दत्तक मुलगी होती. जी राजकुमारी कौलची मुलगी होती.ही राजकुमारी कौल म्हणजेच वाजपेयींची ग्वाल्हेरच्या व्हिक्टोरिया कॉलेजमध्ये (आताचे लक्ष्मीबाई कॉलेज) वर्गमित्र आणि त्यांची अनेक वर्षे सोबती होती.

या नमिताचे लग्न रंजन भट्टाचार्य यांच्याशी झाले. असून त्यांनी विशेष कर्तव्य अधिकारी म्हणूनही काम केले


प्राथमिक शिक्षकाच्या घरात जन्माला आलेल्या अटलजीं यांचा सामाजिक जीवनातील उदय हा भारतीय लोकशाही व त्यांच्या कुशाग्र राजकीय बुद्धिमत्तेचा गौरव आहे. उदारमतवादी आणि जागतिक दृष्टीकोन व लोकशाही तत्वांशी असलेली बांधिलकी यामुळे जनसामान्यांना त्यांच्याबद्दल आदर वाटतो. हाही एक प्रकारचा विक्रमच आहे.



2004 साली भाजपा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर वाजपेयींनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांच्या आरोग्याची स्थिती खालावली.

2009 मध्ये वाजपेयींना पक्षाघाताचा झटका आला ज्यामुळे त्यांची बोलण्याची क्षमता कमी झाली. जून 2018 मध्ये, वाजपेयींना किडनीच्या संसर्गाची तक्रार झाल्यानंतर एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.आणि या दीर्घ आजाराने 16 ऑगस्ट 2018 रोजी वाजपेयी यांचे निधन झाले.ज्या योगे ते सार्वजनिक जीवनातून दूर गेले. अन् हा अतिशय मौल्यवान असा हिरा आपल्यातुन निघुन गेला.यांच्या जाण्याने भारताने एक महान नेता गमावला.


अटल बिहारी वाजपेयींचे जीवन हा एक आदर्श होता, ज्यातून देशसेवा, प्रामाणिकपणा आणि सहिष्णुतेचे मूल्य शिकायला मिळते. त्यांच्या दूरदृष्टीने आणि कार्यकुशलतेने भारतीय राजकारणाला नवे आयाम दिले.


अटल टनल : भारत का भुषण


३ आंक्टोबर २०२० रोजी माननीय प्रधानमंत्री, श्री नरेन्द्र मोदींनी "अटल टनल" या जगातील सर्वात उंच आणि जगातील सर्वांत लांब अशा प्रकारच्या बोगद्याचे एका शानदार सोहळ्याने उद्घाटन केले. आणि भारतीय इतिहासाच्या पुस्तकात आणखी एक सुवर्ण पान जोडले गेले.

लेह ते मनाली असा हा हिमालयातील पूर्व पीर-पंजाल पर्वत रांगेत रोहतांग खिंडीत बनवलेला हा जवळजवळ नऊ किमी लांबी चा सुरंग आहे. हिमालयाच्या पीर-पंजाल रांगांमध्ये समुद्र सपाटी पासुन 10,000 फुट उंचीवर बनवलेला हा कठीण असा मार्ग आहे. या मार्गामुळे मनाली ते लेह हे अंतर 46 कि मी. ने कमी झाले आहे.


  या ठिकाणी किंवा भागात असा काहीतरी मार्ग असावा, अशी पूर्व प्रधानमंत्री स्व. श्री. अटलबिहारी वाजपेयी याची इच्छा होती. नव्हे, ते त्यांचे स्वप्न होते. ते असताना या कार्याची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. अटलबिहारी वाजपेयी यांचे बालमित्र अर्जुन गोपाल यांनी त्यांच्याशी ही बाब शेअर केली होती. असे झाले तर ज्या गावांचा बर्फाच्छादित रस्त्यामुळे संपर्क राहात नाही, त्याच्या साठी हे वरदान ठरेल. असे ते म्हणाले होते. 


या मार्गामुळे लाहौलस्पीती या जिल्हयाच्या अर्थव्यवस्थेत प्रचंड प्रमाणात बदल घडून येईल. व्यापारा साठी हा मार्ग अतिशय उपयुक्त ठरेल.  


    तसेच भारताच्या युद्धनिती विषयक धोरणामध्ये या बोगदयाचा अतिशय महत्वाचा रोल असणार आहे. या मार्गामुळे पाकिस्तान आणि चीन पर्यंतचा प्रवास सहज शक्य होणार आहे. कमी वेळात सैन्य विषयीच्या बऱ्याच गोष्टी साध्य होणार आहेत. म्हणून वेळ अन् अर्थ या दोन्ही गोष्टींचा भार हलका होणार आहे.


  हा बनवताना अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सुविधा उपलब्ध करून देण्याचा पुरेपुर प्रयत्न केला आहे. 


 असा हा जगातील सर्वात लांब, सर्वात उंच "अटल टनल" युगे युगे देशाचे भुषण नक्कीच ठरेल.





 वाजपेयींची ख्याती केवळ एक राजकारणी म्हणून नाही, तर एक महान विचारवंत, कवी आणि देशभक्त म्हणूनही राहील.


त्यांचीच ही कविता..


जन्म-मरण अविरत फेरा


जीवन बंजारों का डेरा,


आज यहाँ, कल कहाँ कूच है


कौन जानता किधर सवेरा।


अंधियारा आकाश असीमित, प्राणों के पंखों को तौलें!


अपने ही मन से कुछ बोलें!

त्यांच्या स्मृतीस

 विनम्र अभिवादन.🙏🏻🙏🏻


सौ.शुभांगी सुहास..