ना.धो.महानोर...

 तरल हृदयाचे कवी, निसर्ग प्रिय व्यक्ती...



ग्रामीण साहित्यकार म्हणून आणि एक उत्कृष्ट निसर्ग कवी म्हणून ज्यांची सगळीकडे ओळख आहे असे ज्येष्ठकवी व साहित्यिक श्री. ना. धो. महानोर यांचे आज सकाळी साडेआठ वाजता

पुणे येथील हॉस्पिटलमध्ये निधन झाले.

ते गेले काही दिवस किडनीच्या आजाराने अतिशय त्रस्त होते. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. तसेच व्हेंटिलेटर वरही त्यांना ठेवण्यात आलेलं होतं.

निसर्गाकडे घेऊन जाणाऱ्या त्यांच्या कविता अतिशय भावपूर्ण आणि संवेदनशील आहेत. त्यांच्या कवितेतून निसर्ग जणू आपल्याशी बोलत आहे, याचा भास होतो. असेच गीत ऐकताना वाटते.

अश्या, निसर्गरम्य परिसरात रमणारा कवि, अलौकिक प्रतिभा असणारे, सहजसोप्या शब्दात वर्णन करणारे, सुलभतेने नैसर्गिक हालचाली आपल्या समोर काव्यात गुंफुन मांडणारे हे कवी.

मनाला हुरहूर लावून आज आपल्यातुन निघुन गेले आहेत.

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.

या निसर्गरम्य परिसरात रमणारे हे व्यक्तिमत्त्व आज निसर्गाच्या बाहुत शांत पणे विसावलेले आहे.

त्यांना ही माझी शब्दांच्या रुपात मी वाहिलेली श्रंध्दांजली.



१६सप्टेंबर १९४२ साली पळसखेडा 

जिल्हा संभाजीनगर. येथे यांचा जन्म झाला.


 यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. आई वडील दुसऱ्यांच्या शेतात काम करून आपली उपजीविका चालवत होते.

 त्यांना चार भाऊ आणि तीन बहिणी.त्यापैकी हे सगळ्यात मोठे भावंड होते.

त्यांचे प्राथमिक शिक्षण हे पळसखेडा येथे झाले त्यानंतर पुढील शिक्षणासाठी जवळच असलेल्या टेंभुर्णी या गावातील शाळेत ते जाऊ लागले.

टेंभुर्णी येथील शाळेत शिकत असताना त्यांची कवितेशी ओळख झाली. आणि तेथूनच मग कवितेची गोडी त्यांची वाढत गेली.

दहावी झाल्यानंतर जळगावच्या महाविद्यालयात कला शाखेत त्यांनी प्रवेश घेतला.

परंतु घरातल्या काही अडचणीमुळे त्यांना अर्धवट शिक्षण सोडून, गावी परतावे लागले. त्यांच्या वडिलांनी स्वतःची पाच एकर कोरडवाहू जमीन घेतली होती, आणि यांमध्ये शेतीच्या कामासाठी म्हणून मग मुलाची गरज त्यांना होती.

  तेव्हापासून महानोर हे शेतीत रमले आणि त्यांची निसर्गाची ओढ ही वाढतच गेली. 

जेबालपणापासून अतिशय कष्टात जीवन जगलेले हे मन आणि त्यातूनच मग निसर्ग कविता ही जन्माला यायला लागल्या.त्यांच्या प्रतिभेला येथेच पंख फुटु लागले.त्यांच्यातील कवी हा निसर्गात रमता रमताच प्रेरित झाला.

 एकाहून एक सरस अशा निसर्ग कविताची वररचना त्यांनी लिहिलेल्या आहेत.

आणि या अद्भुत निसर्ग कवितांनी वाचकांना चांगलीच भुरळ घातलीय .आणि वेडही लावलेलेआहे.

 त्या कविता इतक्या बोलक्या होत्या की थेट निसर्गाशी संवाद साधत आहोत. असं वाचताना वाटते.

महानोर यांचे अनेक कवितासंग्रह वाचकांच्या विशेष पसंतीस उतरलेले आहेत. त्यामध्ये अजिंठा या दीर्घ काव्यसंग्रहाचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल.

 त्याचबरोबर गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, दिवे लागण्याची वेळ, पावसाळी कविता आणि रानातल्या कविता असे त्यांचे उल्लेखनीय काही कविता संग्रह आहेत. आणि हे खूप लोकप्रिय ठरलेले आहेत. आणि 'गपसप' या गावातल्या गोष्टींचा कथासंग्रह देखील वाचकांच्या विशेष पसंतीस उतरलेला आहे.

त्यांच्या कवितेत, निसर्गभान जागविणारे काव्य मुख्यतः असते, आहे. त्याबरोबरच अस्सल संपन्नता आणि तरल अशी ग्रामीण संवेदना, ज्यामध्ये वाचकांना जाणवते. आपल्या मातीशी आणि बोलीभाषेशी सहज संवाद साधणारी त्यांची कविता आहे.

महानोर यांच्या कवितेची वैशिष्ट्ये संवेदनशीलतेतुन स्वभाविकपणे आलेली आहेत. अनुभवा गणिक नवी रूपे घेणाऱ्या त्यांच्या भाववृत्तीशी सूर मिळवणारी वृत्तीही, त्यांच्या कवितेत आढळते.

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.

त्यांनी रचलेली जैत रे जैत सारख्या चित्रपटातील गीते, आजही मराठी रसिकांच्या मनावर मोहिनी घालून आहेत.

या चित्रपटातील, 


'मी रात टाकली,'


 'नभ उतरुआलं,'

 

'आम्ही ठाकर ठाकर, या रानाची पाखरं,'

 

'जांभुळ पिकल्या

झाडाखाली, ढोल कुणाचा वाजजी,'


'असं एखादं पाखरू वेल्हाळ, त्याला समोर येतय आभाळ,' या गाण्यांना प्रेक्षकांनी विशेष दाद दिली आहे.

 तसेच 'एक होता विदूषक'

 'अबोली' 'मुक्ता' 'दोघी' या चित्रपटातील गाणीही त्यांची विशेष लोकप्रिय आहेत.

तसेच सर्जा या चित्रपटातही, अतिशय लोकप्रिय गाणी त्यांनी दिलेली आहेत. त्यांच्या लेखणीच्या प्रतिभेनी दिलेली आहेत.

 त्यामधील,' चिंब पावसानं रानं झालं आबादानी,' त्यानंतर

'मी काट्यातून चालून थकले,'

त्यानंतर अजिंठा या चित्रपटासाठी देखिल त्यांनी गीत लेखन केलेले आहे.

यातील,'मनचिंब पावसाळी,'

'बगळ्या बगळ्या फुलं दे,' या काही गाण्यांचा उल्लेख प्रकर्षाने करता येईल. चित्रपटा व्यतिरिक्तही काव्य लेखन त्यांचे भरपूर आहे ..

त्यांच्या एकंदर सर्वच काव्याचा विचार केला असता, त्यात येणाऱ्या स्त्रिया वेगवेगळ्या रूपात वाचकांना भेटतात. जीवनातील बिकट परिस्थितीला सामोरे जाताना.

 कधी ती असते..संसाराचा गाडा ओढणारी स्त्री, कधी उदास झालेली, तर कधी हताश झालेली, अशी स्त्री आपल्याला भेटते.

 

आपल्या सुखदुःखासह अवतीभवती वावरणारी स्त्री, नां.धो. महानोर यांच्या कवितेतून रेखाटलेली आपल्याला आढळते.

 'पीठ पडे जात्यातून, तसं पाणी डोळ्यातून.

'आई करपले तुझे हात, भाकरी भाजून भाजुन.

 या अतिशय साध्या आणि सोप्या शब्दांमधून 'आई' या काव्या मध्ये स्त्रीचे संपूर्ण आयुष्य नेमके कोणत्या पद्धतीने जाते?याची जाणीव कवीने करून दिलेली आहे. आईचे दुःख, 

'डोळाभर पाणी,

 दाटलेली कहाणी.'

असे दु:ख आई गेल्यानंतर त्यांनी आपल्या समोर व्यक्त केले.

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.

ही आणखी एक कविता..


 या नभाने या भुईला दान द्यावे ,

 आणि या मातीतून चैतन्य गावे .

कोणती पुण्याई अशी? येती फळाला,

जोंधळ्याला चांदण्या लखडून जावे.

 या नभाने या भुईला दान द्यावे.


आणि माझ्या पापणीला पूर यावे,

 पाहता ऋतुगंध कांती सांडलेली,

 पाखरांशी खेळ मी मांडून जावे.

 या नभाने या भुईला दान द्यावे .


 गुंतलेले प्राण या रानात माझे,

 फाटकी ही झोपडी काळीज माझे,

 मी असा आनंदूनी बेहोश होता

 शब्द गंधे तू मला बाहूत घ्यावे.

 या नभाने या भुईला दान द्यावे.

अशी ही मन हेलावून टाकणारी ही कविता..

असं हे निसर्गचक्र आपल्या शब्दात बांधताना, एका मनाचे. मनातलं चित्रण आणि जगताचं पालन पोषण करणारे निसर्गाचे रूप, हे माझ्या शेतीशी आणि झाडांशी आणि निसर्गातील हिरवाईशी जोडलेलं नातं. माझ्या आयुष्याच्या पाटीवर अक्षर लिहून गेले. घरातील भक्तिमय वातावरण माझ्या मनावर ठसा उमटवून गेलं.


त्यांच्या या आणखी काही अतिशय लोकप्रिय अशा रचना..


मी रात टाकली, मी कात टाकली 

मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली 

हिरव्या पानात हिरव्या पानात चावळ चावळ चालती 

भर ज्वानीतली नार 

अंग मोडीत चालती 

ह्या पंखावरती,

मी नभ पांघरती 

मी मुक्त मोरनी बाई, चांदण्यात न्हाती


अंगात माझिया भिनलाय ढोलीया 

मी भिंगर भिवरी त्याची गो माल्हन झाली 

मी बाजींदी

मन बाई मी फुलात न्हाली..


अतिशय उत्तम कलाकृती म्हणून आपल्याला परिचित असलेल्या 'सर्जा'या चित्रपटातील हे सुमधुर असे हे गीत आहे.


चिंब पावसानं रान झालं आबादानी 

चिंब पावसानं रानं झालं आबादानी

 झाकु कशी पाठीवरली चांदन गोंदणी

 बाई चांदणं गोंदणी 


झाकू नको कमळनबाई, एकांताच्या कोनी, 

रुपयांनी अंगावरली, सखे लावण्याची खाणी 


राया तुझे हात माझ्या हातात गुंफोनी 

उन्हात चांदणं आलं लाज पांघरोनी 


तुझ्या डोळ्यांच्या सांदीत सावल्यांची राणी 

पाण्यामंदी झिम्माधरं

आभाळ अस्मानी


अंगावर थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी सांगताना येई काही 

साजना बोलाणी.


तसेच एक होता विदुषक या सिनेमातील हे 

रविंद्र साठे यांच्या आवाजातील

'मी गाताना गीत तुला लडिवाळ हा,

हा कंठ दाटूनी आला,

 

आणखीही एक भावनिक ही कविता येथे देते आहे.


सूर्यनारायण नित नेमाने उगवा,

अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा


मोडक्या घरांच्या बिंद्रावणाशी सांजेला, दिव्यांचा आधार जडो त्यांच्या संसाराला.


ओंजळीने भरू दे गा पाखरांच्या चोची, 

दुःखात पंखांना असो सावली मायेची 


आबादानी शेत भरू दाण्यांने,

तुझ्या पालखीला शब्द बांधू तुकोबाचे.



सौ.शुभांगी सुहास जुजगर.