Baipan Bhari Deva

बाईपण भारी देवा.

अगदी नावांमध्येच भारीपण असलेली ही कलाकृती.. खरंच हा सिनेमा आज बॉक्स ऑफिसवर पिंगा घालत आहे. या पिंग्याने या आज समस्त महिलावर्गाला एक पॉझिटिव्ह टच दिला आहे. महिलाच नव्हे तर पुरुष वर्ग ही या सिनेमाच्या प्रेमात पडला आहे. एक साधी, सरळ अशी सहा बहिणींची ही कथा. अतिशय भावपूर्ण आहे. यातील भाव भावनांची गुंतवणूक ही प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. त्याचबरोबर यामधील सोज्वळता आणि साधेपणा हा ही सगळ्यांना मोहित करून जात आहे.हा चित्रपट बघताना मनात, ही तर कथा तर माझ्या नात्यातील निताची आहे.अरे ही तर आपल्या मावशीची आहे.ही स्टोरी तर हीची आहे, तिची आहे.असंच वाटत राहते . सात बहिणीचा हा हा केवळ पिंगाच नसून अतिशय सोज्वळतेने, निरागसपणे होणारे हे महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन. या चित्रपटाद्वारे दाखवण्यात या टीमला घवघवीत यश मिळालेले आहे.

ही माहिती आपण kusumanjali.com वर वाचत आहात 

यामध्ये नुसती संस्कृतीच नसून स्त्रीच्या मनातील सुखदुःखाचे वर्णनही याद्वारे त्या व्यक्त करत आहेत. याद्वारे तिला एक मोकळे पण प्राप्त होऊन ती परत मोकळ्या झालेल्या आकाशासारखी स्वच्छ होते. आणि येणाऱ्या नवीन आव्हानाला पेलण्यासाठी सज्ज होते.जणु पंखात नव चैतन्य भरून. हेच या कलाकृतीच्या यशस्वीतेचे गमक आहे.असे मला वाटते आहे. सहा बहिणींची अनोखी गोष्ट सांगणारी ही कथा,एकमेका मध्ये अनोख्या पध्दतीने गुंफली आहे.तसेच यातील अभिनेत्रींनीही अतिशय सोज्वळतेने, निरागसपणे पण कसदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.

या चित्रपटात काकडे सिस्टर्सच्या भूमिकेत रोहिणी हट्टांगडी, शिल्पा नवलकर, दीपा परब, सुकन्या मोने, वंदना गुप्ते आणि सुचित्रा बांदेकर या अभिनेत्री आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार कमाईच्या बाबतीत हा चित्रपट चक्क मराठी चित्रपटसृष्टीतला सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे.यावेळी 'सैराट'या सिनेमाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आता काही दिवसात हा चित्रपट 'सैराट'चा रेकॉर्ड मोडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने १२ कोटींची कमाई केली! दुसऱ्या आठवड्यात २४ कोटींवर गेली!! तिसऱ्या आठवड्यात पुन्हा या चित्रपटाने २१ कोटी!!!

आणि चौथ्या आठवड्यात १० कोटींची कमाई केली. एका महिन्यात या चित्रपटाने ८३ कोटी ५० लाख कमावले आहेत. अवघ्या ५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाची कामगिरी पाहून, सगळेच अवाक् झालेले आहेत.. यापुढे ही हा असाच चालू राहिला तर हा सिनेमा १०० कोटींचा आकडा पार करणारा मराठी सिनेमा ठरण्यास काहीच वेळ लागणार नाही. 'बाईपण भारी देवा'चा धुमाकूळ काही थांबत नाही. सिनेमा रिलीज होऊन १ महिना नुकताच झाला आहे. होईलही पण थिएटरमधली गर्दी कायम आहे. सहा बायकांनी घातलेला पिंगा बघण्यासाठी महिलांची थिएटरमध्ये गर्दी होत आहे. अजूनही प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहांत गर्दी करत आहेत. 'बाईपण भारी देवा'चे महिन्याभराचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे. पाचव्या आठवड्यातही बाईपणची बॉक्स ऑफिसवरील जादू तसूभरही कमी झालेली नाही.

पुरूषोत्तम मास

तीन वर्षांनी येणारा हा अधिक मास आहे.यालाच पुरुषोत्तम मास असेही म्हणतात.या महिन्याचे स्वामित्व कोणीही स्वीकारायला तयार नव्हते.म्हणुन मग भगवान श्री विष्णूंनी हे स्वामित्व स्वीकारले.यामुळेच या महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.हा मास अधिक धार्मिक बनला,जप तप देवदर्शन दान धर्म या सर्व गोष्टींना प्राधान्य देण्यात आले आहे. आणि यावर्षी आलेला हा महिना म्हणजे श्रावण महिन्याच्या जागेवर आल्याने त्यास खुपच महत्त्व प्राप्त झाले आहे. श्रावण हा आधीच धार्मिक महिना आहे.आणि हा आता म्हणजेच अधिक श्रावण… असा हा संयोग या वर्षी जुळुन आला आहे. पुरुषोत्तम पुरी हे तीर्थक्षेत्र बीड या जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात आहे. माजलगाव येथून हे अवघ्या 22 किमी अंतरावर आहे. दक्षिणेतील गंगा असे आपण जिला ओळखतो तेती म्हणजे गोदावरी नदी. आणि याच नदीच्या काठावर हे पुण्यक्षेत्र वसलेले आहे.

या म्हणजे अधिक महिना, म्हणजेच 'पुरुषोत्तम मास.' या मासामध्ये श्री. पुरुषोत्तम भगवंताचे दर्शन घेणे म्हणजे अतिशय पुण्यप्रद समजले जाते.आणि आणि म्हणून पुरुषोत्तम पुरी येथील श्री पुरुषोत्तम भगवंताचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून भाविक भक्त येत असतात. येतात. या तीर्थक्षेत्राची आख्यायिका अशी आहे,एक शार्दुल नावाचा दैत्य.या दैत्याने गावाजवळच जायको देवीचे मंदिर आहे. त्या देवीला आणि आजुबाजुच्या सर्व देवादिकांनाही अन् पंचक्रोशीतील लोकांना शार्दुलदत्याने खूपच त्रासुन सोडले होते. हा त्रास असहनीय होऊन देवी मातेने भगवान विष्णूकडे धाव घेतली. मातलेल्या दैत्याला शासित करण्यास सांगितले. म्हणूनच तेव्हा भगवान विष्णूंनी, पुरुषोत्तम अवतार धारण करून शार्दुल दैत्याचा, सुदर्शन चक्राने शिरच्छेद केला.आणि हे चक्र गोदावरी नदीच्या काठावर, गोदेच्या पाण्याने स्वच्छ केले होते.त्या स्थळाला 'चक्रतीर्थ' या नावाने संबोधले जाते आहे. अनेक भाविक भक्त येथे स्नान करून पशुधारी सावळ्या विठोबाचे दर्शन घेतात. या महिन्यात म्हणजे अधिक महिन्यात भगवान श्री विष्णूंचे पुरूषोत्तम रुपातील दर्शन हे समुळ पापाचा नाश करणारे आहे.असे सांगितले जाते.

ही माहिती आपण kusumanjali.com वर वाचत आहात.

तसेच पुरूषोत्तम मंदिरा शेजारीच सहालक्षेश्वराचे मंदिर आहे या मंदिराची कलाकुसर अत्यंत सुबक अशी आहे.या मंदिराच्या गाभाऱ्याची प्रतिकृती ही वृंदावनातील कृष्ण मंदिरा सारखी आहे.आणि विशेष म्हणजे या मंदिराच्या विटा पाण्यावर तरंगतात. श्री क्षेत्र त्रंबकेश्वर पासून पुरुषोत्तम पुरी पर्यंत सहा लक्ष ही संख्या पूर्ण होते म्हणून याला सहा लक्षेश्वर असे म्हणतात. या मंदिरात स्वयंभू अशे महादेवाचे शिवलिंग आहे.याच जवळ श्री वरद विनायक गणपती बाप्पांची चार फुट उंचीची मुर्ती आहे.तिथेच माता पार्वतीच्या पादुका ही आहेत.असा हा त्रिवेणी संगम क्वचित ठिकाणीच पाहायला मिळतो. पुरुषोत्तम पुरी च्या पुर्व दिशेला अनेक वर्षापुर्वी ऋषी मुनींनी यज्ञ केले.त्या यज्ञामुळे तिकडे भस्माची टेकडी निर्माण झाली आहे.याभस्माचे वैशिष्ट्य म्हणजे ते मऊ असे आहे.

ही माहिती आपण kusumanjali.com वर वाचत आहात 

पुर्वी म्हणजे जवळजवळ तेराव्या शतकात यादव राजा रामदेव यांने त्याचा पुरूषोत्तम नावाचा मंत्री यांच्याकडे या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सोपवले होते. आणि त्याने ते यशस्वी रित्या पुर्ण केले होते. यावरून गावाचे नाव ही पुरूषोत्तमपुरी असेच रूढ झाले.

आभा कार्ड

आभा म्हणजेच, 'आयुष्यमान भारत' होय. आयुष्यमान भारत डिजिटल मिशनचा हा एक भाग आहे . म्हणुन भारत सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड हा उपक्रम सुरू केला आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाला असे हे कार्ड काढुन घ्यावे, असे आवाहन ही सरकारने केले आहे.

'आभा हेल्थ कार्ड' हे खऱ्या अर्थाने प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य कार्डच आहे. यामध्ये स्वतः च्या संपूर्ण आरोग्या विषयीच्या माहिती ची नोंद या मध्ये असणार आहे.प्रत्येक जणांच्या आरोग्य विषयी संपूर्ण माहिती नोंदवलेली दिसेल. या कार्डाच्या मदतीने डॉक्टरांना, तुम्हाला चेक करायला खूप सोपे होईल. म्हणजेच तुम्हाला आरोग्य विषयी डॉक्टरांना असे विशेष काही सांगायची गरज पडणार नाही. म्हणजे तुम्हाला जुनी फाईल बरोबर घेऊन जाण्याची गरजच पडणार नाही.त्यात सगळे नमूद केलेलं असेल. हे कार्ड म्हणजे खऱ्या अर्थाने प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची हेल्थ कुंडलीच आहे. असेही म्हणायला हरकत नाही. असं हे कार्ड प्रत्येकाने बनवून घेण्याचं आवाहन, आपल्या शासनाने केलेले आहे. हे कार्ड म्हणजेच प्रत्येककाच्या  आरोग्याचा आरसाच जणु असणार आहे.

ही माहिती आपण kusumanjali.com वर वाचत आहात.

तुम्ही भारतात कुठेही राहत असाल तरीही, तुम्ही ऑनलाईन पद्धतीने, म्हणजेच तुमच्या मोबाईल वरुन ही या कार्डसाठी ची नोंदनी तुम्ही करू शकता. हे कार्ड बनवण्याकरीता नॅशनल डिजिटल च्या हेल्थ मिशनच्या संकेतस्थळावर, या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही याची नोंदणी करू शकता. (healthid.ndhm.gov.in) यानंतर तुम्ही होम पेज वर 'Create ABHA Number' असे क्लिक करून त्यानंतर (ABHA) तयार करण्या साठी दोन पर्याय दिसतील.प्रत्येकाने आप आपल्या आधार कार्ड च्या आधारे हे कार्ड बनवुन घेता येईल. नाही तर ड्राईव्हिंग लायसन्स घ्या आधारे ही याची नोंदनी करू शकता.

सौ.शुभांगी जुजगर.